स्वातंत्र्योत्तर काळातील संत वाङ्मयाच्या वाटचालीच्या इतिहासात न्या. बळवंतराव घाटे उर्फ अण्णासाहेब यांच्या नावाला अनन्यसाधारण महत्व आहे. केवळ आध्यात्मिक विकास नव्हे तर सामाजिक बांधिलकीची प्रचिती देखील अण्णासाहेबांनी आपल्या वर्तणुकीतून दिली. प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय कसा साधावा हे अण्णासाहेबांच्या जीवनातून प्रतीत होते.
तत्कालीन निजाम राज्याचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण आणि त्यानंतर राज्याचे झालेले त्रिभाजन या प्रक्रियेत हैद्राबाद स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि त्यात आमूलाग्र योगदान असलेल्या अनेक व्यक्तींचे चरित्र काळाच्या पडद्याआड गेले आहे. न्या. केशवराव कोरटकर हे असेच एक व्यक्तिमत्व आहे. नवीन पिढीपुढे न्या. केशवराव कोरटकरांचे चरित्र पुन्हा आणण्याचा हा एक प्रयत्न.
मी एक उत्स्फूर्त कवी नाही. परंतु वाङ्मयीन दृष्ट्या पूर्ण अशा कवितांची निर्मिती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आलो आहे. नवीन पिढीला रुचाव्यात यादृष्टीने कविता लहान आणि बोली भाषेतले शब्द वापरून केल्या आहेत. तास माझा संस्कृत भाषेचा गाढ अभ्यास नाही. त्यामुळे संस्कृतप्रचुर शब्द वापराणे तसेही मला जमणाऱ्यातले नाही. ज्या काही कविता केल्या आहेत त्या वाचकाला आवडतील अशी आशा करतो.